वसमत पुन्हा हादरले! पांगरा शिंदे परिसरात गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:59 IST2026-03-25T11:58:42+5:302026-03-25T11:59:12+5:30

३ महिन्यांच्या विश्रांतीनंतर वसमतमध्ये जमिनीतून मोठा आवाज; भूगर्भ शास्त्रज्ञांच्या तपासणीची मागणी

Earthquake Fear Returns to Hingoli! Ground Shakes in Vasmat After 3 Months; Residents Panic | वसमत पुन्हा हादरले! पांगरा शिंदे परिसरात गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीती

वसमत पुन्हा हादरले! पांगरा शिंदे परिसरात गूढ आवाजासह भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीती

-इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली):
वसमत तालुक्यासह परिसरात भूगर्भातून गूढ आवाज येऊन जमीन हादरण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. तब्बल तीन महिन्यांच्या शांततेनंतर आज, २५ मार्च रोजी सकाळी ८:०९ मिनिटांनी पांगरा शिंदे या गावांसह परिसरातील अनेक गावांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सव्वा आठ वाजता 'गूढ' आवाज
बुधवारी सकाळी अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाला आणि जमीन हादरली. याचा सर्वाधिक फटका पांगरा शिंदे, कुरुंदा, डोणवाडा, कोठारी, वापटी, कुपटी आणि शिरळी या गावांना बसला. "सकाळी अचानक मोठा आवाज झाला आणि घरातील भांडी पडली. आम्ही घाबरून घराबाहेर पळालो," अशी आपबीती स्थानिक नागरिक संतोष शिंदे यांनी सांगितली. अधिकृत यंत्रणेकडे या धक्क्याची नोंद अद्याप झाली नसली, तरी प्रत्यक्षदर्शींनी हा हादरा मोठा असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रशासकीय अनास्था आणि वाढती असुरक्षितता
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तीन तालुक्यांत गेल्या सात वर्षांपासून सातत्याने जमिनीतून आवाज येण्याच्या घटना घडत आहेत. २०२५ मध्येही अनेकदा मोठे धक्के बसले होते. मात्र, वारंवार तक्रारी करूनही महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून भूगर्भ शास्त्रज्ञांमार्फत ठोस तपासणी केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हिंगोलीचा हा भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील होत चालला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Web Title : वसमत फिर हिला: भूकंप जैसे झटकों और रहस्यमय आवाजों से दहशत

Web Summary : वसमत क्षेत्र में भूकंप जैसे झटके और रहस्यमय आवाजें सुनाई दीं, जिससे निवासियों में दहशत फैल गई। पांगरा शिंदे और आसपास के गांव सबसे ज्यादा प्रभावित हुए। स्थानीय लोग बार-बार होने वाली घटनाओं की जांच की मांग कर रहे हैं, और पिछली घटनाओं और बढ़ती सुरक्षा चिंताओं के बावजूद प्रशासनिक निष्क्रियता का हवाला दे रहे हैं।

Web Title : Vasmat Shaken Again: Earthquake-like Tremors and Mysterious Sounds Cause Panic

Web Summary : Vasmat region experienced earthquake-like tremors and mysterious sounds, creating panic among residents. Pangra Shinde and surrounding villages were most affected. Locals demand investigation into the recurring phenomenon, citing administrative inaction despite past incidents and growing safety concerns.