शेजाऱ्यांच्या त्रासामुळे महिलेने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:39 IST2018-09-28T00:38:50+5:302018-09-28T00:39:06+5:30
तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

शेजाऱ्यांच्या त्रासामुळे महिलेने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील कनेरगाव येथील एका ३५ वर्षीय महिलेने शेजाºयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून गळफास घेतल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
वसमत तालुक्यातील कनेरगाव येथील कालंदा यादवराव खराटे (३५) या विवाहित महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी दुपारी हा प्रकार समोर आला. घटनास्थळावर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंद खडके, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, जमादार बडे, कोकरे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. मयताजवळ चिठ्ठ्या सापडल्याने हे प्रकरण वेगळे असल्याचे समोर आले होते. त्यात शेजारील व्यक्तीच्या नेहमीच्या त्रासाला व भांडणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद असल्याचे समोर आल्याने आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
या प्रकरणात रात्री उशिरा मयताचे पती यादव बबनराव खराटे यांच्या तक्रारीवरून अर्चना सपकाळ, सुनीता बालाजी जगताप, वंदना भोसले, बालाजी जगताप या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयतास या सर्वांनी ‘तू आमच्या लई चुगल्या लावतीस’, असे म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पत्नीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.