लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:00 PM2020-03-28T20:00:02+5:302020-03-28T20:01:52+5:30

ज्या संसर्गितांना दुस-या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत. 

Due to lockdown, HIV infected patients will now receive medicines at the nearest hospital | लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

लॉकडाऊनमुळे आता एचआयव्ही संसर्गितांना जवळच्या रूग्णालयातच मिळणार औषधी

googlenewsNext

हिंगोली :  लॉकडाऊनमुळे एचआयव्ही संसर्गितांच्या औषधीमध्ये खंड पडू नये, याची खबदारी घेतली जात असून आता या रूग्णांना जवळील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातच औषधी वाटप केली जाणार आहे. त्यामुळे एचआयव्ही संसर्गितांना औषधी घेण्यासाठी हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयाच्या एआरटी केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही.

एमएसएसीएस मुंबई आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालया तर्फे हा स्वागताह निर्णय घेतला आहे. 
एचआयव्ही, एड्स रुग्णांसाठी  हिंगोली जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात औषधी घेणाºया संसर्गितांना ‘लॉकडाऊन’ च्या काळात जिल्ह्याच्या एआरटी केंद्राकडे येणे शक्य नसल्याने त्यांना त्यांच्या घराशेजारी सोयीच्या ठिकाणी औषधी पुरविण्याचा निर्णय  एमएसएसीएस मुंबई आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांनी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांनी हा निर्णय घेतला आहे.

सर्व एचआयव्ही संसर्गितांनी औषध घेण्यात खंड पडू देऊन नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी केले आहे. ज्या रुग्णालयात औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यांचे नावे व त्या ठिकाणच्या आयसीटीसी कर्मचाºयांचा मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे आहेत. सकाळी १० ते १ या वेळेत रूग्णांना मोफत औषधी वाटप केली जाईल. औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय, कर्मचारी पवन इंगोले यांचा मोबाईल क्रमांक ९७६७०२३८३८, तसेच वसमत उपजिल्हा रुग्णालय सुमित्रनंदन सावंत, मोबाईल क्रमांक ८८५६०५२४८०, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय, आनंद चारण मोबाईल क्रमांक ८१४९८०३०१२, सेनगाव ग्रामीण रुग्णालय किशोर वानखेडे, ९३२५०२४५५३ तसेच आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालय, कर्मचारी चंद्रकांत कोलते आदी कर्मचाºयांसोबत रूग्णांनी संपर्क साधून औषधी घेऊन जावीत. असे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे. तसेच ज्या संसर्गितांना दुसºया टप्प्यातील (सेकंड लाईन) औषध चालू आहेत, त्यांनी मात्र मुख्य जिल्ह्याच्या एआरटी केंद्रात जाऊनच औषधी घ्यायची आहेत. 

एआरटीकार्ड आवश्यकच
जिल्ह्यात सध्या १७०० च्या जवळपास एचआयव्ही संसर्गित रूग्ण आहेत. जवळील रूग्णालयातून औषधी घेऊन जाताना सोबत एआरटीकार्ड नेणे बंधनकारक आहे. त्यामुळे रूग्णांनी याची खबदारी घ्यावी व कार्डसोबत घेऊन जावे असे जिल्हा सामान्य रूग्णालय हिंगोली तर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Due to lockdown, HIV infected patients will now receive medicines at the nearest hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.