ब्रेक निकामी झाल्याने जीपची उभ्या ट्रकला धडक; औंढा नागनाथ येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:58 IST2018-03-28T15:58:53+5:302018-03-28T15:58:53+5:30
भेंडेगाव रेल्वे गेटजवळ जीपने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात जीप रेल्वे गेटच्या लोखंडी सुरक्षा खांबावर जाऊन धडकली.

ब्रेक निकामी झाल्याने जीपची उभ्या ट्रकला धडक; औंढा नागनाथ येथील घटना
हिंगोली : भेंडेगाव रेल्वे गेटजवळ जीपने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात जीप रेल्वे गेटच्या लोखंडी सुरक्षा खांबावर जाऊन धडकली. अपघातात जीपमधील १ जन जागीच ठार तर इतर १० जण जखमी आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.२८) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास झाला.
वाघाळा ( ता. मंठा) येथून जाधव व मुळे कुटुंब बासर येथे लहान मुलाचे जाऊळ काढण्यासाठी जात होते. औंढा नागनाथ - वसमत मुख्य रस्त्यावरील भेंडेगाव रेल्वे गेटवर वाहतूक बंद होती. यावेळी जीपचा ब्रेक निकामी झाल्याने जीप समोर उभ्या ट्रकवर धडकून सुरक्षा कठड्यावर आदळली. यात अपघातात गोदावरी पूजाराम मुळे (५५, रा.वाघाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इंद्राबाई किशन मुळे (७०), शाऊबाई सुखदेव कांगणे (५०), पुंजाराम किशन मुळे (६०), शालिनीताई मारोती लोंढे (५४), रामप्रसाद विठोबा आघाव (३५), धोंडाबाई संतोबा लोंढे (५०), आशामती रामकिशन जाधव (२४), विठ्ठल पुंजाराम मुळे (३५), पूजा रामकिशन जाधव (३५), आदित्य रामकिशन जाधव (दीड वर्ष) हे जखमी आहेत.