कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:31 IST2025-06-04T11:27:02+5:302025-06-04T11:31:11+5:30

खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा पत्नीने रचलेला बनाव उघड, पत्नीच्या हाती बेड्या

Drunk husband attacked with a knife, wife kills him and sets his body on fire | कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव

कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव

- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि. हिंगोली) :
डोक्यात कत्तीचे घाव घालीत विवाहित महिलेने पतीचा खून केल्याची घटना ३ जून रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली. मृतदेह पेटवून देत आत्महत्येचा बनाव केला. परंतु शवविच्छेदनाप्रसंगी डोक्यावरील कत्तीचे घाव दिसून आल्याने खुनाचे बिंग फुटले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात सदर प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

कैलास भगवानराव गलंडे (वय ४०) हा दारू पिऊन आपल्या पत्नीसोबत वाद घालीत भांडण करत होता. ३ जून रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कैलास हा शिवीगाळ करीत पत्नीच्या अंगावर कत्ती घेऊन गेला. यावेळी पत्नीने झटापट करत हातातील कत्ती हिसकावून घेतली, आणि पतीच्या डोक्यात वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव होऊन कैलास निपचित पडला. पती काहीच हालचाल करीत नाही हे पाहून पत्नी हादरली. खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी घरासमोरील दुचाकीमधून पेट्रोल आणत पती कैलासच्या मृतदेहावर ओतून पेटवून दिले. तसेच सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

मुलाच्या फिर्यादीवरुन आईविरुद्ध खुनाचा गुन्हा...
३ जून रोजी पतीने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. मयताच्या डोक्यात कत्तीचे घाव दिसून आल्याने मयताच्या नातेवाईकांकडून सदर आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा मयताचा मुलगा गणेश कैलास गलंडे (रा. बाभुळगाव) यांच्या फिर्यादीवरून आई सुमित्रा कैलास गलंडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्यासह इतर पोलिसांनी बाभूळगाव येथील घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपी पत्नीला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Drunk husband attacked with a knife, wife kills him and sets his body on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.