शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 14:29 IST

दुष्काळवाडा : परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे. 

- इलियास शेख, असोलवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली

कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासीबहुल गाव. या गावात अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचीच संख्या जास्त. यावर्षी पाऊस कमी पडल्याने पिके वाळून गेली. त्यातही पावसाचा खंड अधिक. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे. 

या गावाची लोकसंख्या १४५०. कमी शेती असल्याने जवळपास सर्वच कुटुंब दसऱ्यानंतर कामाच्या शोधात स्थलांतर करतात. येथील शेतकरी ऊसतोड व हळदी काढण्यासाठी इतरत्र स्थलांतर करतात. वीट कारखाना तसेच मिस्त्रीच्या हाताखाली कामावर जातात. दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने डोळ्यासमोर पिके करपून जात आहेत. सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाहीत. वाळून गेल्या. खरबाड जमिनीवरची पिके तर गेल्यातच जमा आहेत. तुरीला अजून फुलोराच आला नाही. साहेब, शेतात जाऊ वाटत नाही. आता पोटापाण्याचे काय होणार, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केला. मागील तीन वर्र्षांपासून सततची नापिकी व दुष्काळी परिस्थितीने आम्ही कदरलो आहोत. खरीप पिकाला लावलेला खर्चही निघत नाही. वर्षभर कसे जगावे, उदरनिर्वाह कसा करावा, संसाराचा गाडा कसा हाकावा, अशी आपबिती सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. 

चारा आणि पाण्याचा प्रश्न आहे यावर्षी परतीचा पाऊस पडला नाही. पावसाचा खंड झाल्यामुळे खरीप पिकांना याचा फटका बसला. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. चारा पिकांचे नियोजन करावे, जनावरांचा चारा व त्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने एक शेततळे घ्यावे, संरक्षित पाणी असेल तरच रबीचे नियोजन करावे.  -  गोविंद कल्याणपाड, तालुका कृषी अधिकारी 

बळीराजा काय म्हणतो?- माझ्या घरी ५ एकर कोरडवाहू शेती आहे. अत्यल्प पडलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. परिणामी तीनचा उतारा आला. शेतीत लावलेला पैसाही निघत नाही. वर्षभर काय खावे, कसा उदरनिर्वाह करावा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. - माणिकराव असोले

- दोन महिन्यांपासून पाऊस नाही. कापसाची बोंडं फुटत नाहीत. सव्वाएकर शेतात संसाराचा गाडा कसा हाकावा? शासनाने भरीव आर्थिक मदत करावी, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उद्भवतो. आम्हाला मजुरी करूनच पोट भरावे लागते. - संतोष असोले 

- अडीच एकरमध्ये मला ८ क्ंिवटल सोयाबीनचा उतारा आला. पेरणीसाठी लावलेला खर्चही निघत नाही. मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसला. परतीच्या पावसानेही दगा दिला. दुसऱ्याच्या कामावर जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. - रामराव असोले 

- या गावचे सर्वच शेतकरी अत्यल्प भूधारक असून, डोळ्यासमोर पीक वाळून जात आहे. तुरीला तर अजून फुलोराही आला नाही. जमिनीत भेगा पडल्या आहेत. या हंगामात तूरही हातची गेली आहे. मला ५ एकर शेती असूनही त्यातून आतापर्यंत कधीच चांगले उत्पन्न झाले नाही. दरवर्षी काहीतरी वेगळेच कारण असते. - बाबूराव काळे  

- मोलमजुरी करूनच मी माझी एक एकर शेती करतो. त्यात यावर्षी काहीच हाती आले नाही. पेरणीचा खर्चही निघाला नाही. कामासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही. मुलाबाळांचे शिक्षण जाते. त्यामुळे येथेच मजुरी करून पोट भरावे लागते. - अशोक काळे १४५० - लोकसंख्या

काही आकडेवारी : 

२७८ - घरे६६५ - मतदार६४४.५५  - हेक्टर गावाचे भौगोलिक क्षेत्र६०१.४७ - हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र ५९४ - हेक्टर पेरणी क्षेत्र ३१- हेक्टर खरीप ज्वारी१०५ - हेक्टर कापूस ५५ - हेक्टर तूर०९ - हेक्टर मूग०७ - हेक्टर उडीद९१६.६० - मि.मी. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान७२९.३४ - मि.मी. यावर्षी पडलेला पाऊस७९.५७% - पडलेला पाऊस 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी