धावत्या ट्रेलर मधून चालकाने एकास फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:56 IST2019-07-27T16:52:13+5:302019-07-27T16:56:16+5:30

जखमीवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत

The driver thrown an unknown person from the running trailer | धावत्या ट्रेलर मधून चालकाने एकास फेकले

धावत्या ट्रेलर मधून चालकाने एकास फेकले

औंढा नागनाथ:जिंतूर कडून येणाºया एका ट्रेलरच्या चालकाने अज्ञात व्यक्तीला चालत्या गाडीमधून धार फाटा येथील साई मंदिराजवळ असलेल्या रस्त्यावर फेकून दिले. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

औंढा नागनाथ-जिंतूर या  राष्ट्रीय महामार्गावर क्र.एम.एच. 12 एम.व्ही. 75 66 या धावत्या ट्रेलरमधून चालकाने एका अनोळखी इसमाला फेकून दिले.   गावातील दिपक रानमाळ यांनी ही घटना पाहिली. त्यानी धावत असलेल्या या ट्रेलरचा पाठलाग करून त्याला वाई गोरखनाथ येथे पकडले.वाहन चालकाला पकडून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात  आणत असतानो शिरड शहापूर येथे आले असता बहाणा करून चालक फरार झाला. जखमी व्यक्तीला उपचार करण्यासाठी गोजेगाव येथील पं. स.माजी सभापती राजेंद्र सांगळे यांनी या अज्ञात व्यक्तीला औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेतील चालक व फेकून दिलेल्या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.  याबाबत औंढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेतली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Web Title: The driver thrown an unknown person from the running trailer