Doctor wife's complains of jewelry theft against husband | डॉक्टर पत्नीची पती विरोधात दागिने चोरीची तक्रार

डॉक्टर पत्नीची पती विरोधात दागिने चोरीची तक्रार

वसमत (जि. हिंगोली) : येथील डॉ. मनीषा तम्मेवार यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार दिली असून, तक्रारीत आरोपी म्हणून चक्क डॉक्टर पती व अन्य एकाचे नाव घेतले आहे. 

१ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत तम्मेवार या डॉक्टर पतीसह सोमनाथ केंचे (दोघे रा. वसमत) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वसमत शहर पोलीस ठाण्यात डॉ. मनीषा तम्मेवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, घराचे दार कापून घरातील कपाटातील १ लाख ४५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. पती डॉ. चंद्रकांत तम्मेवार व सोमनाथ केंचे यांनीच ही चोरी केली असल्याचा आरोप या तक्ररीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून वसमत शहर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उदय खंडेराय करीत आहेत. 
 

Web Title: Doctor wife's complains of jewelry theft against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.