शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधक बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’ हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना ...

‘पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी’

हिंगोली : येथील बसस्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. प्रवाशांना पाणी बाजूच्या हॉटेलमधून विकत आणावे लागत आहे. पिण्याचे पाणी बसस्थानकात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात आली; परंतु अजून तरी पाण्याची सोय उपलब्ध करून दिली नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवाशांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

कळमनुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शेतात पाणी असूनही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळमनुरी शहरात अनियमित पाणीपुरवठा

कळमनुरी : शहरातील रेणुकानगर, गणेशनगर, भोई गल्ली, ब्राह्मणगल्ली, सहयोगनगर आदी नगरांमध्ये पंधरा-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे, तसेच पाणी कमी प्रमाणात येत आहे. वेळेवर पाणी सोडण्याबाबत नगर परिषदेच्या संंबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी लक्ष दिले नाही. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शहरात पाणीपुरवठा वेळेवर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बसस्थानकात कचऱ्याचे ढीग

कळमनुरी : येथील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी साचलेला कचरा उडून प्रवाशांच्या अंगावर येत आहे. कचऱ्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आगार प्रमुखांनी बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

नव्याने गतिरोधक टाकण्याची मागणी

हिंगोली : शहरातील खटकाळी भागातील गतिरोधक

थोडे उंच झाले आहे. काही दुचाकीचालक गतिरोधकाच्या बाजूने ये-जा करीत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना दुचाकी अंगावर येण्याची भीती वाटत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतिरोधक नव्याने टाकावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा

हिंगोली : शहरातील कापड गल्ली भागात वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहने उभी करण्यावरून बहुतांश वेळा वादही निर्माणही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी या भागातील व्यापाऱ्यांनी केली आहे.