अॅपे- आॅटोच्या धडकेत निवृत्त तलाठ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:29 IST2019-04-12T00:28:16+5:302019-04-12T00:29:21+5:30
फिल्टर वॉटरच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या अॅपेआॅटोची मोटारसायकलला धडक बसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांचे बंधू सेवानिवृत्त तलाठी दत्तराव मुटकुळे यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले.

अॅपे- आॅटोच्या धडकेत निवृत्त तलाठ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : फिल्टर वॉटरच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या अॅपेआॅटोची मोटारसायकलला धडक बसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांचे बंधू सेवानिवृत्त तलाठी दत्तराव मुटकुळे यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले.
हिंगोलीतील गणेशवाडी भागातून एका कार्यक्रमाला हजेरी लावून दत्तराव मुटकुळे ( वय ६२) हे मारोती जाधव यांच्यासमवेत मोटारसायकलने गावाकडे जात होते. हिंगोली-अकोला रोडवर तिरुपतीनगरनजीक त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाºया आॅटोने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र मुटकुळे यांचा मृत्यू झाला. तर जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची वार्ता पसरल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी जमली होती. भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षीयांनीही येथे भेट दिली.
१२ रोजी सकाळी ९ वा. आडगाव येथे दत्तराव मुटकुळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.