चक्कर आल्याने हमालाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:17 IST2018-08-11T00:17:00+5:302018-08-11T00:17:13+5:30

येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामात हमाली करणाऱ्या वसमतच्या कामगार हमालाचा चक्कर येऊन पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 Death due to dizziness | चक्कर आल्याने हमालाचा मृत्यू

चक्कर आल्याने हमालाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथील शासकीय स्वस्त धान्य गोदामात हमाली करणाऱ्या वसमतच्या कामगार हमालाचा चक्कर येऊन पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कुरूंदा येथे स्वस्त धान्याचा शासकीय गोदाम आहे. या ठिकाणी वसमतचे कामगार हमाल या गोदामात पोते उतरवितात. पोते उतरताना वयोवृद्ध हमाल शेख मजहर शेख खादर (५३) यांना चक्कर आली अन् ते खाली पडले. यावेळी ते जागीच मरण पावले, असे तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले. मयत हे वसमत येथील शुक्रवारपेठ भागातील रहिवासी आहेत. मयत शेख मजहर यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कुरूंदा पोलिसांनी भेट दिली. या घटनेबाबत पंचनामा करून मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी वसमतच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले होते.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया कुरूंदा पोलीस ठाण्यात सुरू होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी शासकीय गोदामामध्ये कुरुंदा परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Web Title:  Death due to dizziness