औंढा तालुक्यात धाडसी घरफोडी; २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:44 IST2020-07-03T16:44:30+5:302020-07-03T16:44:52+5:30

कुटुंबातील सदस्य वरील मजल्यावर झोपले असताना झाली चोरी

Daring burglary in Aundha taluka; They stole 22 ounces of gold jewelry | औंढा तालुक्यात धाडसी घरफोडी; २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले

औंढा तालुक्यात धाडसी घरफोडी; २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले

हिंगोली : औंढा तालुक्यातील लाख येथे चोरट्यांनी संजय लोंढे यांच्या घरातून जवळपास २२ तोळे सोन्याचे दागिने चोरले. सध्याच्या भावानुसार याची किंमत १२ लाख रुपये आहे. १ जुलै रोजी रात्री संजय लोंढे यांच्या कुटुंबातील सदस्य वरील मजल्यावर झोपले होते. 

चोरट्यांनी रात्री तळमजल्याच्या हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.  त्यांनी हॉलमधील लोखंडी कपाट चावी लावून उघडले. त्यातील लग्नात खरेदी केलेली दुहेरी मण्याच्या प्रत्येकी एक तोळे वजनाच्या तीन पोथा, तीन एकदानी, आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके जोड, अडीच तोळे वजनाच्या तीन जोडपत्त्या, अकरा ग्रॅम वजनाच्या एक जोडपत्त्या, एक तोळा वजनाचा नेकलेस, तीन तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, दीड तोळ्याचे सोन्याचे सेवन पीस, साडेतीन तोळ्यांच्या गव्हाळ मण्याच्या तीन पोथा, तीन तोळ्यांचे एक गंठन, सोन्याचे लॉकेट, २0 तोळे चांदीच्या पायातील चेनचे पाच जोड, बाजूबंद, कमरेची चेन, चांदीचे दागिने व रोख ९0 हजार रुपये पळविले आहेत. याबाबत एकूण ३.९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याची तक्रार बासंबा पोलिसांत दाखल झाली आहे. मात्र, ज्यावर्षी सोने खरेदी केले, तो भाव लावल्याने चोरीतील दागिन्यांची किंमत कमी दिसत आहे. 

Web Title: Daring burglary in Aundha taluka; They stole 22 ounces of gold jewelry