शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

टंचाईच्या बैठकीला दुसऱ्यांदाही दांडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:46 IST

तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºयांवर लोकप्रतिनिधीचा असलेला वचक बैठकीत दिसून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.तर प्रशासन आढावा बैठका घेण्यावर जोर देत आहे. मागील बैठकीला दांडी मारलेल्या अधिकाºयांमुळे बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. तेच अधिकारी याही बैठकीला गैरहजर असल्याने यावरुन अधिकाºयांवर लोकप्रतिनिधीचा असलेला वचक बैठकीत दिसून आला.हिंगोलीतील कल्याण मंडपम् येथे मागच्या वेळी रद्द झालेली पाणीटंचाई आढावा बैठक तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आ. डॉ. संतोष टारफे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला जि. प. व पं. स. सदस्यांसह तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, सरपंच पती, ग्रामसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याही बैठकीत मागचेच पाढे वाचण्यात आले. नवीन असे काहीच नसताना कोथळज येथील विंधन विहिरीचा प्रश्न चांगलाच चर्चिला गेला. तेथे बोअर पाडून वर्ष लोटले तरीही त्या ठिकाणी हातपंपच बसविला नसल्याने पाणीप्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. तसेच याही बैठकीत जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी तालुक्यातील विविध समस्यांचा मांडताना सौर उर्जांच्या पंपांची संख्या विचारली. मात्र ती काही सांगताच आली नाही. तर मागील वर्षी अधिग्रहण केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर अजून रक्कम पडलेली नसल्याने प्रभारी जि. प. सीईओ ए.एम.देशमुख यांना आ. तान्हाजी मुटकुळे यांनी फोन लावून स्पिकर आॅन करुन पैसे खात्यावर टाकण्याची तारीख विचारली. तर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेल्या ठिकाणी अधिकाºयांनी भेटी देण्याच्या सूचना दिल्या. फक्त आठ दिवसांत अधिग्रहणाच्या प्रस्तावांवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असेही खडसावून सांगितले. सोमवारीच जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक असल्याने प्रतिनिधी बैठकीच्या ठरलेल्या वेळेवर पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे अनेक सरपंचांनी या ठिकाणाहून काढता पाय घेण्याची तयारी केली होती. परंतु; उशिरा का होईना आ. मुटकुळे आल्यानंतर कुठे इतरत्र घोळक्या-घोळक्याने बसलेले सरपंच व ग्रामसेवक बैठकीत आले. या बैठकीस मात्र प. सं. सभापती विलास काठमोडे, गणाजी बेले, दिलीप घुगे यांची उपस्थिती होती.तोंडसुखावर भरआ. रामराव वडकुते यांनी मागील बैठकीत उपस्थित अधिकाºयांची हजेरी घेतली होती. तर यांत्रिकी विभागाचे कुंभारीकर गैरहजर असल्याने त्यांनी पाठविलेल्याही प्रतिनिधीला काहीच माहिती नसल्याने नवीन बैठक घेण्याचे सुचविले होते. त्यानुसार सोमवारी घेतलेल्याही खेळीमेळी बैठकीत तोंडसुख घेण्यावरच भर देण्यात आला. आ. डॉ. संतोष टारफे यांनी तालुक्यात पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रा. पं. सदस्यांनी पाण्यासाठी उपयोजना करण्यास सांगितले. तर पाणीच उपलब्ध नसेल तर अधिग्रहण किंवा टँकरचे प्रस्ताव वेळीच शहदर करावे, अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर स्वत: आम्हाला फोन करण्याच्याही सूचना दिल्या.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळMLAआमदार