शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नुकसान ४० हजार, भरपाई फक्त १ हजार; शेतकऱ्याने शासनाला परत केली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 06:44 IST

जयपाल प्रकाश भांडारकर असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत.

विरली (जि. भंडारा) : गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसान भरपाई मिळाली. ४०,००० हजार रुपयांचे नुकसान झाले असताना प्रत्यक्षात मदतीपोटी केवळ एक हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. ही तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा संताप इतका अनावर झाला की, त्याने गुरूवारी एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले.

जयपाल प्रकाश भांडारकर असे या व्यथित शेतकऱ्याचे नाव असून ते लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी आहेत.जयपाल भांडारकर यांची गट क्र. ६२/२ मध्ये ०.४० हेक्टर शेती आहे. गतवर्षी रब्बी हंगामात तालुक्यात गारपीट झाली. शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्याही शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान  झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. यादीत जयपाल यांचेही नाव होते. भरपाई मिळण्यास वर्ष उलटले.

रक्कम खात्यात जमा झाली. किती ?  तर केवळ एक हजार रुपये. ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर उद्विग्न झाले. ही मदत शासनाला परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी तडक लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात एक हजार रुपये जमा केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही दिले. भांडारकर यांची ही भूमिका चर्चेचा विषय झाली आहे. भांडारकर यांच्याशिवाय अनेक शेतकऱ्यांना अशीच एक-दोन हजार रुपये भरपाई मिळाली आहे. 

०.४० हेक्टरवरील हरभरा पिकाचे गारपिटीने पूर्णतः नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. पंचनामा कमी क्षेत्राचा दाखविल्याने तुटपुंजी रक्कम मदत म्हणून मिळाली. त्यामुळे ती मी परत केली.   - जयपाल प्रकाश भांडारकर

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरEknath Shindeएकनाथ शिंदे