तितली-भोवरा जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:05 IST2019-01-25T00:05:12+5:302019-01-25T00:05:31+5:30
औंढा तालुक्यातील पिंपळदरी यात्रेत डोंगरावर तितली-भोवरा जुगार खेळ २४ जानेवारी रोजी सुरू होता. विशेष पथकाने डोंगरावर जुगार खेळणाºया चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींकडील मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे.

तितली-भोवरा जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी यात्रेत डोंगरावर तितली-भोवरा जुगार खेळ २४ जानेवारी रोजी सुरू होता. विशेष पथकाने डोंगरावर जुगार खेळणाºया चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींकडील मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे.
ग्रामीण भागात सध्या यात्रामहोत्सव सुरू आहे. यात्रेत सर्रासपणे अवैध धंदे चालू आहेत. पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी कारवाई केली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे सध्या यात्रामहोत्सव सुरू आहे. डोंगरावर तितली भोवरा नावाचा जुगार खेळ सुरू होता, याबाबत विशेष पथकाला माहिती मिळताच कारवाई केली. यावेळी पोलिसांना पाहताच काही आरोपींनी धूम ठोकली. कारवाईदरम्यान जुगार खेळणाºयांकडून पोलिसांनी ३ हजार २७० रूपये रोकड तसेच ३ हजारांचे साहित्य असा एकूण ६ हजार २७० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विवेक पंपटवार (रा. आ. बाळापूर), गजानन रिठ्ठे (रा. पिंपळदरी), ईस्माईल सय्यद, संजय महोरे या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती विशेष पथकाचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली.