हाणामारी प्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:26 IST2018-12-24T00:26:38+5:302018-12-24T00:26:54+5:30
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका बारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन गटांत झालेल्या हाणामारीतील घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हाणामारी प्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका बारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन गटांत झालेल्या हाणामारीतील घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या लकी बारकडे जाणाºया रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन टोळक्यांमध्ये २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मार्केट कमेटीच्या वादावरून जोरदार हाणामारी सुरू झाली होती. वारंगा येथील पोलिसांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला. हाणामारी चालू असताना पोलिस आल्याचे समजताच काहीजण घटनास्थळावरून पसार झाले. नागेश मल्लिकार्जुन टाके (रा.सावरगाव हल्ली मुक्काम मनाठा), हर्षवर्धन मधुकर वाठोरे (रा.मनाठा, विकास दत्तराव सूर्यवंशी), रवी रामेशराव वाठोरे, वैभव सूर्यवंशी, अविनाश उर्फ बबलू बालाजी बोईनवाड, सतीश धांडे, सागर बल्लाळ (सर्व रा.मनाठा) यांच्याविरुद्ध पोना शेख गौसोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी वाद घालून हाणामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ ठिकाणी छापे
हिंगोली : पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात ११ ठिकाणी छापे मारून अवैध दारूसाठा जप्त केला आहे.
हिंगोली शहर, कळमनुरी, वसमत ग्रामीण, कुरूंदा व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ११ ठिकाणी कारवाई करून १२ हजार ४०२ रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. कारवाई दरम्यान पोलिसांनी दारूसाठा जप्त करून संबंधित ठाण्यात गुन्हा दाखल केला.