CoronaVirus : जालन्यातील एसआरपी जवान हिंगोलीत पॉझिटिव्ह; संपर्कातील ४६ जणांना केले आयसोलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:02 IST2020-04-25T13:58:26+5:302020-04-25T14:02:02+5:30
हा रुग्ण हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला.

CoronaVirus : जालन्यातील एसआरपी जवान हिंगोलीत पॉझिटिव्ह; संपर्कातील ४६ जणांना केले आयसोलेट
हिंगोली : जालना येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेला मात्र सध्या हिंगोली तालुक्यातील हिवरा बेल येथे आपल्या गावी आलेल्या एका जवानालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण हिंगोलीच्या एसआरपीएफच्या जवानांसोबत मालेगावहून जालन्यात उतरला. मात्र सोबतचा एक जण पॉझिटिव्ह आल्याने त्याचा शोध घेतला तर तो गावी आल्याचे आढळले.
हिंगोलीत एसआरपीएफ जवानांनी कोरोनाच्या रेड झोन भागात सेवा बजावल्याने त्यांना थेट क्वारंटाईन केले होते. मग जालन्यातील जवान गावापर्यंत पोहोचला कसा? हा गंभीर प्रश्न आहे. हिंगोली एसआरपीएफच्या जवानांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली जात होती. त्यात जालना येथील एसआरपीएफचे जवानही सोबत आल्याचे सांगण्यात आले होते. हिंगोलीतील सहा जवान पॉझिटिव्ह आल्यानंतर हिवरा बेल येथेही रेड झोनमधून सेवा बजावून परतलेला जालन्याचा जवान २२ एप्रिल रोजी येथे आल्याचे गावपातळीवरील समितीने सांगितले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या जवानाला आयसोलेशनमध्ये दाखल करून त्याची चाचणी घेतली. त्यात २५ रोजी हा जवान पॉझिटिव्ह आला.
गावात पथक दाखल
हिवरा बेल गावात आरोग्य यंत्रणेचे पथक दाखल झाले आहे. खुद्द जिल्हाधिकारी रुचेश जयवंशीच या गावात पोहोचले आहेत. त्यांनी परिसर सील करण्याच्या सूचना देत या जवानाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने माहिती न दवडता समोर येण्याचे आवाहन केले. त्याच्या संपर्कातील जवळपास ४६ जणांना आयसोलेशन वॉर्डात भरती केले असून आणखी काही जण समोर येत आहेत.
दुसऱ्याच दिवशी केले आयसोलेट
याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, गावपातळीवरील समितीकडून २२ रोजी हा जवान गावात आल्याची माहिती मिळाली. २३ रोजी त्याला आयसोलेशनमध्ये टाकले. २५ रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील सर्वांनाच