Coronavirus : हिंगोलीत आतापर्यंत 223 रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:32 IST2020-06-23T11:31:50+5:302020-06-23T11:32:36+5:30

जिल्ह्यातील बाधीत असलेले 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

Coronavirus: Hingoli has so far cured 223 corona patients | Coronavirus : हिंगोलीत आतापर्यंत 223 रुग्ण झाले बरे

Coronavirus : हिंगोलीत आतापर्यंत 223 रुग्ण झाले बरे

ठळक मुद्देसद्यस्थितीत 17 रुग्ण बाधीत

हिंगोली : जिल्ह्यात कोवीडचे एकूण 240 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 223 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 17 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर मधून काल कोविडचे बाधीत असलेले 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड मधील 06 रुग्ण,  कोरोना केअर सेंटर वसमत येथील 01 रुग्ण तर कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमधील 04 रुग्ण असे एकूण 11 रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.

Web Title: Coronavirus: Hingoli has so far cured 223 corona patients