coronavirus : हिंगोली जिल्ह्यात ७ नवीन रुग्णांची वाढ; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:12 IST2020-08-08T20:09:56+5:302020-08-08T20:12:00+5:30

जिल्ह्यातील एकूण बाधितांची रूग्णसंख्या ८१५ झाली आहे

coronavirus: 7 new corona cases in Hingoli district; Death of one | coronavirus : हिंगोली जिल्ह्यात ७ नवीन रुग्णांची वाढ; एकाचा मृत्यू

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात ७ नवीन रुग्णांची वाढ; एकाचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ८ आॅगस्ट रोजी पुन्हा नवीन सात रूग्ण आढळुन आले आहेत. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. ४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

हिंगोली जिल्हा रूग्णालयाकडे ८ आॅगस्ट रोजी प्राप्त अहवालानुसार एकूण ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर हिंगोली शहरातील एका ६५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ४३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची रूग्णसंख्या ८१५ झाली असून त्यापैकी ६०६ जण बरे झाले आहेत. तर २०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणा-यापैकी हिंगोली जिल्हा रूग्णालय आयसोलेशन वार्डातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आॅक्सीजन सुरू आहे. तर दोन रूग्ण बायपॅप मशिनवर आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

Web Title: coronavirus: 7 new corona cases in Hingoli district; Death of one