Corona Virus In Hingoli : हिंगोलीत एक संशयित रुग्ण आढळला; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:53 IST2020-03-30T20:50:39+5:302020-03-30T20:53:27+5:30
प्रकृती ठीक असून पुढील उपचार सुरू आहेत

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत एक संशयित रुग्ण आढळला; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात एक कोरोना संशयित रूग्ण दाखल केला आहे. त्याचे वय ५४ वर्षे असून तो कोवीड केसचा क्लोझ कॉन्टॅक्ट असून त्याला पुढील तपासणीसाठी आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती केले आहे.
सद्यस्थितीमध्ये त्याची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. त्याचा थ्रोट स्वॉब पुढील तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या पथकामार्फत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे.
हिंगोलीत सद्यस्थितीत होम क्वारंटाईन (घरातच अलगीकरण) मध्ये ठेवण्यात आलेले पाच जण आहेत. त्यामध्ये २ आस्ॅट्रेलिया, २ मालदिव, १ कझाकिस्तानमधून हिंगोली येथे आले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयामार्फत तयार केलेल्या रॅपिड रेसपोन्स टिम व पोलीस प्रशासनामार्फत दर दिवशी पाठपुरावा करण्यात येत आहे.