मुंबईहून परतलेल्या वसमत आगाराच्या ३२ चालक - वाहकांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:42 IST2020-12-09T19:40:44+5:302020-12-09T19:42:20+5:30
३२ पैकी २१ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे तर ११ कर्मचाऱ्यांचाही अहवाल कोरोनासदृष्यच आहे

मुंबईहून परतलेल्या वसमत आगाराच्या ३२ चालक - वाहकांना कोरोनाची बाधा
वसमत : वसमत एसटी आगाराचे मुंबईहुन परतलेल्या चालक वाहकांची कोरोना तपासणी केली असता, तब्बल ३२ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
६० पैकी ४० कर्मचाऱ्यांचीच तपासणी झाली. त्यात ३२ पॉझिटिव्ह आले आहेत. बेस्ट प्रशासनाने मागणी केल्याने परभणी विभागातून एसटी महामंडळाने चालक, वाहक मुंबईला पाठवले होते. पहिल्या टप्प्यात ६० चालक- वाहक पाठवले होते. हे कर्मचारी १२ दिवसांची सेवा बजावून सोमवारी वसमतला परत आले. त्यांची तपासणी केली असता तब्बल ३२ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ३२ पैकी २१ कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे तर ११ कर्मचाऱ्यांचाही अहवाल कोरोनासदृष्यच आहे, त्यांची पून्हा तपासणी करावी लागणार आहे.
मुंबईहून परतलेल्या ६० पैकी ४० कर्मचाऱ्यांचीच तपासणी झाली आहे. उर्वरित २० पैकी पुन्हा किती जणांना बाधा झाली की कसे, हे तपासणीअंतीच समजणार आहे. पहिल्या टप्प्यातील ६० कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठी वसमत आगाराने एसटी बस पाठवली होती. त्या बसमध्ये पुन्हा ३० कर्मचारी मुंबईला पाठवले आहेत. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने वसमतमध्ये खळबळ उडाली आहे. आता हे कर्मचारी रजेवर असतील तर संपर्कातील लोकांच्या नव्या चाचण्या कराव्या लागणार आहेत.
मुंबईहून परत आल्यानंतर चालक - वाहक कर्मचारी रजेवर गेलेले आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. - डी.एम.मुपडे, आगरप्रमुख