कोरोनाने आठ जणांचा मृत्यू; नवे २५२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:12+5:302021-04-14T04:27:12+5:30

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात दाताडा १, वसमत १, जि. रुग्णालय १, न.प. कॉलनी १, गंगानगर २, खुडज १, रामाकृष्णानगर ...

Corona killed eight people; 252 new patients | कोरोनाने आठ जणांचा मृत्यू; नवे २५२ रुग्ण

कोरोनाने आठ जणांचा मृत्यू; नवे २५२ रुग्ण

Next

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात दाताडा १, वसमत १, जि. रुग्णालय १, न.प. कॉलनी १, गंगानगर २, खुडज १, रामाकृष्णानगर २, भिरडा १, मंगळवारा १, हिलटॉप कॉलनी १, सावकरनगर १, सुराणानगर ३, शिक्षक कॉलनी औंढा १, रिसाला बाजार ५, गोरेगाव २, पिंपरखेड १, पोळा मारोती ३, जिजामातानगर १, माळहिवरा २, भिरडा १, जीनमातानगर १, एसआरपीएफ कॅम्प १, घोटादेवी १, यशवंतनगर १, आनंदनगर १, चिंचोली १, नेहरूनगर १, असे ४० रुग्ण आढळले. वसमत परिसरात वसमत २७, श्रीनगर १, सरस्वतीनगर १, कौठा रोड २, बालाजीनगर १, तिरुपतीनगर १, बँक कॉलनी १, अकबर कॉलनी १, बुधवार पेठ २, स्वानंद कॉलनी ३, माळवटा १, पाटीलनगर १, सोमवार पेठ १, बालाजीनगर १, बोरगाव ५, ब्राह्मण गल्ली २, हट्टा ९, आरळ १, असे ६१ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात देवळी १, चिखली २, हदगाव २, जवळा पांचाळ ३, डोंगरकडा ३५, असे ४३ रुग्ण आढळले. औंढा परिसरात रांजाळा २, औंढा २, असे ४ रुग्ण आढळले. बरे झाल्याने जिल्हा रुग्णालय २०, लिंबाळा २६, वसमत १९, कळमनुरी ६१, औंढा १०, असे एकूण १३६ रुग्ण घरी सोडण्यात आले.

तब्बल आठ जणांचा मृत्यू

१३ एप्रिल रोजी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात रिसाला बाजार येथील ७० वर्षीय महिला, आखाडा बाळापूर येथील ३० वर्षीय पुरुष, जवळा बाजार येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे, तर डोंगरकडा येथे तिघांचा मृत्यू झाला असून, यात ८० वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष व ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय वसमत येथील ६७ वर्षीय पुरुष व हिंगोलीच्या ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सक्रिय रुग्ण ११२०

आजपर्यंत ८९६८ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ७७१९ बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजघडीला ११२० जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत १२९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. दाखल असलेल्यांपैकी ३२९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर आहेत.

५८ ऑक्सिजन बेड उपलब्ध

हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर व कवठा येथे ऑक्सिजनचे ५८ बेड उपलब्ध आहेत, तर १२ बेड खाजगी रुग्णालयात आहेत. जिल्ह्यातील पाच शासकीय कोरोना केअर सेंटरमध्ये १८७४ साधे बेड असून, यापैकी ५२६ भरले आहेत, तर १३४८ शिल्लक आहेत.

Web Title: Corona killed eight people; 252 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.