कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 17:36 IST2020-01-23T17:35:44+5:302020-01-23T17:36:51+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे झाला अपघात

कंटेनर- दुचाकी अपघातात चुलते- पुतणे जागीच ठार
औंढा नागनाथ : औरंगाबाद-जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या समोरासमोर अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ( दि. २३ ) दुपारी २ वाजता घडली. शिवाजी यादवराव शिंदे व आकाश किशन शिंदे अशी मृतांची नावे असून ते चुलते व पुतणे असल्याची माहिती आहे. हा अपघात गोळेगाव नजीक झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद- जिंतूर महामार्गावरून औरंगाबादहून एक कंटेनर ( क्रमांक NL01N 5295 ) हैद्राबादकडे जात होता. दरम्यान, गोळेगावहून शिवाजी यादवराव शिंदे ( ३१, रा. नागणगाव ता. जितुर ) व आकाश किशन शिंदे ( १९, रा. नागणगाव ) दोघे चुलते-पुतणे जिंतूरकडे दुचाकीवरून (MH22 AL9900 ) जात होते. महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात शिवाजी शिंदे आणि आकाश शिंदे दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच औंढा ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.