शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

संगणकीय ‘अग्निशामक’ यंत्रणा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:01 IST

अचानक आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. हिंगोली नगरपालिकेचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून एकाच अग्निशामकवर होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. विभागाकडे नवीन अत्याधुनिक संगणकीय अग्निशामक वाहन उपलब्ध झाले. त्यामुळे आता अग्निशामक विभागाचे बळ वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अचानक आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. हिंगोली नगरपालिकेचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून एकाच अग्निशामकवर होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. विभागाकडे नवीन अत्याधुनिक संगणकीय अग्निशामक वाहन उपलब्ध झाले. त्यामुळे आता अग्निशामक विभागाचे बळ वाढले आहे.हिंगोली नगर पालिकेकडे मागील सहा ते सात महिन्यांपासून केवळ एकच अग्शिामक वाहन उपलब्ध होते. पूर्वी दोन अग्निशामक होते. परंतु त्यातील एका वाहनात बिघाड झाला अन् ते वाहन भंगारात जमा झाले. त्यामुळे पालिकेचा कारभार एकाच वाहनांवर सुरू होता. नवीन अग्निशामकची मागणी करण्यात आली होती. आता या नवीन अग्निशामकची प्रतीक्षा संपली असून वाहन उपलब्ध झाले आहे. शिवाय नवीन वाहन कसे हाताळावे, कोणती खबरदारी घ्यावी, संगणक कसे चालवावे याबाबत चालक, व कर्मचाऱ्यांना दोनदिवसीय प्रशिक्षण दिले. अग्निशामक विभागातील चालक शाहीदखॉ पठाण, संदीप कांबळे, रघुनाथ बांगर, आकाश साबळे यांच्यासह इतर कर्मचाºयांनाही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अग्निशामक बाईकही विभागाकडे लवकरच उपलब्ध होणार आहेत.अग्निशामक वाहनात पाणबुडी, जनरेटरची सुविधा४आगीच्या घटना कधी कोठे घडतील याचा नेम नाही. जुन्या वस्तीमध्ये आग लागल्यास त्या ठिकाणी मोठे वाहन पोहोचू शकत नाही. त्यामुळे आता उपलब्ध झालेल्या अग्निशामकचा आकार लहान आहे. त्यामुळे मोठे अग्निशामक ज्या ठिकाणी पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी हे वाहन गल्लीबोळीत सहज पोहोचू शकते. या अग्निशामकची ४०० लिटर वॉटरटँकची क्षमता असून ५० लिटर फोमची सुविधा वाहनांत उपलब्ध आहे. इतर अग्निशामकच्या तुलनेत हे वाहन दुप्पटीने काम करेल, असे कर्मचाºयांनी सांगितले. या वाहनांचे संपूर्ण काम संगणकावर आहे. तसेच वाहनात लाईट गेल्यास जरनेटरची सुविधा असून टँकमधील पाणी संपल्यास कुठल्याही ठिकाणी तलाव किंवा विहिरीतील पाण्याचा उपसा करता यावा. हे पाणी थेट टँकमध्ये भरल्या जावे यासाठी पाणबुडीची सुविधा आहे. तसेच आॅक्सिजन किट, एलईडी फोकस, अनाऊंसमेंटची सुविधा आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीfireआग