सख्खा शेजारी ठरला पक्का वैरी; क्षुल्लक कारणावरून वीट डोक्यात घालून केला शेजाऱ्याचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:36 IST2019-01-25T14:35:03+5:302019-01-25T14:36:13+5:30

बाळू गाडे असे युवकाचे नाव असून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

close neighbor Becoming a murder; Neighborhood's murder by negligent reason | सख्खा शेजारी ठरला पक्का वैरी; क्षुल्लक कारणावरून वीट डोक्यात घालून केला शेजाऱ्याचा खून 

सख्खा शेजारी ठरला पक्का वैरी; क्षुल्लक कारणावरून वीट डोक्यात घालून केला शेजाऱ्याचा खून 

कुरूंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गुरुवारी रात्री  (दि.२४) ९ वाजेच्या सुमारास दोन युवकांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत होत एकाने वीट डोक्यात घालत दुसऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळू गाडे असे युवकाचे नाव असून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, कुरुंदा येथे राहणाऱ्या बाळू गाडे (३५) यांचे त्यांच्या शेजाऱ्यासोबत शुल्लक कारणांवरून भांडण होत असे. गुरुवारी रात्री सुद्धा त्यांचे शेजाऱ्यासोबत असेच भांडण झाले. मात्र, यावेळी वादाचे रुपांतर हाणामारीत होत शेजाऱ्याने बाळू यांच्या डोक्यात विटाने जोरदार मारहाण केली. यात बाळू गंभीर जखमी झाल्याने त्यांना लागलीच एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान रात्री १२ दरम्यान मृत्यू झाला. 

आज सकाळी सपोनी शंकर वाघमोडे, जमादार बी.टी. केंद्र व आमले घटनास्थळी दिली. यावेळी दोघांमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला हे  स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

Web Title: close neighbor Becoming a murder; Neighborhood's murder by negligent reason