जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: April 29, 2023 15:09 IST2023-04-29T15:09:05+5:302023-04-29T15:09:35+5:30

नर्सी ना. पोलिस ठाण्यात परस्परविरोधी १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Clash between two groups over land dispute; A case has been registered against 17 persons | जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथे जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी १७ जणांविरूद्ध नर्सी ना. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

यात अर्चना सिद्धार्थ खंदारे यांच्या तक्रारीवरून सुभाष आनंदा खंदारे, दिलीप आनंदा खंदारे, हनुमान आनंदराव खंदारे, आनंदा शंकर खंदारे, प्रशांत सुभाष खंदारे, वैभव सुभाष खंदारे, आम्रपाली दिलीप खंदारे, सावित्री आनंदा खंदारे, संगिता सुभाष खंदारे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. माझे जागेत हिस्सा का मागता असे म्हणून लोखंडी रॉडने तसेच लाकडी काठिने मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड मारून फॅक्चर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार व्ही.बी. कुटे तपास करीत आहेत. 

दुसऱ्या गटाकडूनही तक्रार
दुसऱ्या गटाकडूनही तक्रार देण्यात आली. सुभाष आनंदा खंदारे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश कुंडलिक खंदारे, वामन कुंडलिक खंदारे, अनुराधा प्रकाश खंदारे, सिद्धार्थ कुंडलिक खंदारे, कुंडलिक खंडुजी खंदारे, भागवत प्रकाश खंदारे, अर्चना सिद्धार्थ खंदारे, सावित्री वामन खंदारे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. जागेच्या वादातून लोखंडी रॉडने, लाकडी काठिने मारहाण करून खिशातील ३० हजार रूपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार एम.वाय. काळे तपास करीत आहेत.

Web Title: Clash between two groups over land dispute; A case has been registered against 17 persons