बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला ‘बाल विवाह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 06:30 PM2020-05-26T18:30:18+5:302020-05-26T18:31:26+5:30

बालविवाह थांबविण्याबाबत कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला.

'Child Marriage' Avoided by Child Protection Vigilance | बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला ‘बाल विवाह’

बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला ‘बाल विवाह’

googlenewsNext

हिंगोली : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागातील एका १४ वर्षीय मुलीचा विवाह २६ मे, २०२०  रोजी नियोजित होता. २५ मे रोजी बाल विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांना प्राप्त होताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार बाल विवाह रोखण्यात आला.

मुलीचे आई-वडील आणि चुलता यांना बाल विवाह कायदा २००६ नुसार बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच बाल विवाह केल्यामुळे मुला-मुलीवर होणारे दुष्परिणाम शारिरीक व मानसिक घटकांवर होणारे दूरगामी परिणाम तसेच कायद्याचा भंग केल्यास योग्य ती कारवाई होवू शकते अशी समज दिली. त्यानंतर मुलीच्या कुटूंबातील सदस्य बालविवाह थांबविण्यास तयार झाले. बालविवाह थांबविण्याबाबत कुटूंबाकडून लेखी जबाब घेण्यात आला. सदर बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन हिंगोलीचे टिम सदस्य तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर गावातील बालविवाह प्रतिबंध अधिकारी ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक, पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य केले. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: 'Child Marriage' Avoided by Child Protection Vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.