'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 14, 2022 13:09 IST2022-09-14T13:08:51+5:302022-09-14T13:09:47+5:30
घोटा देवी या ठिकाणी गळफास घेऊन एकाची आत्महत्या; परिसरात खळबळ

'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या
हिंगोली : तालुक्यातील घोटा देवी येथील तुळजा भवानी देवी मंदिरामध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर मयत व्यक्तीचे नाव गजानन किसन जगताप असून आत्महत्येपूर्वी सदर युवकाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजाभवानी देवी मंदिरातील आम्ही वंशपरंपरागत सेवेकरी असून येथील कामे करत असताना कार्याध्यक्ष हे आपल्या पदाचा गैरवापर करून मंदिरात कामे करत असतांना केवळ जातीय त्रास देतात. तर या त्रासाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे. तसेच कार्याध्यक्ष व काही सदस्य हे माझ्या जीवित्वास जबाबदार राहतील व या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन सखोल चौकशी करून माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे पत्र मयत गजानन किसन जगताप यांनी लिहून ठेवले आहे. तर हा प्रकार आज १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.