कळमनुरी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:28 IST2025-05-20T15:27:24+5:302025-05-20T15:28:11+5:30

हिंगोली ते कळमनुरी या रस्त्यावर हिंगोली शहरापासून काही अंतरावर घडली घटना

Burning car on Kalamanuri road; Fortunately, the driver and passengers survived | कळमनुरी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले

कळमनुरी रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; सुदैवाने चालकासह प्रवासी बचावले

हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी रस्त्यावर २० मे रोजी दुपारी एका कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत कारमधील प्रवासी खाली उतरल्याने अनर्थ टळला. पण, चालक जखमी झाला आहे.

हिंगोली ते कळमनुरी या रस्त्यावर हिंगोली शहरापासून काही अंतरावर मंगळवारी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे, या ठिकाणी कार थांबलेली होती आणि कारमधील काही प्रवासी खाली उतरले होते. मात्र चालक कारमध्येच होता. 

कारने पेट घेतल्याची माहिती हिंगोली नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहोचला परंतु तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेत कारचा चालक जखमी झाला असून, त्यांच्यावर हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: Burning car on Kalamanuri road; Fortunately, the driver and passengers survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.