कपाशीवरील बोंडअळी; ‘कृषी’ तर्फे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:03 IST2018-04-27T00:03:37+5:302018-04-27T00:03:37+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात२६ एप्रिल रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

कपाशीवरील बोंडअळी; ‘कृषी’ तर्फे कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात२६ एप्रिल रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी वसंतराव नाईक मकृवि परभणीचे डॉ. यू.एन. आळसे यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ. पी.पी. शेळके यांनी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सप्तसूत्रे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर राजेश भालेराव, अजयकुमार सुगावे यांनी मार्गदर्शन केले.
गत वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून झाला होता. बीटी कापूस असूनही शेंदरी बोंडअळीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याने आणि शेतकºयांच्या काही चुकीच्या लागवड पद्धतीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. कपाशीची फरदड न घेणे, गेल्या हंगामातील शेतातील कापसाचे अवशेष नष्ट करणे, खोल नांगरट करणे, कमी कालावधीचे वाण वापरणे, शेतीचे नेहमी सर्वेक्षण करणे इत्यादी प्रमुख बाबींचा वापर करून शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव थांवता येईल, असे डॉ. आळसे यांनी सांगितले.
याबाबत आतापासूनच शेतकºयांमध्ये जनजागृती करून येत्या हंगामात या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास करायचे उपाय समजून सांगण्यास सांगण्यात आले. कृषी सहायकांनी गावोगाव यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन लोखंडे यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषी उपसंचालक एस.व्ही. लाडके, प्रकल्प उपसंचालक आत्मा एम.डी. तीर्थकर, कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल इत्यादी हजर होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते.