शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 14:01 IST2021-11-22T13:58:59+5:302021-11-22T14:01:31+5:30

औत चालवित असताना वाद घालून तिघांनी मारहाण करून पाठीत चाकूने मारले.

A bullock cart plowed through the field, stabbing the farmer in the back; they also attacked his mother's nose | शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार

शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार

हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा शिवारात गोविंद पिसाळ हा युवक औत चालवित असताना वाद घालून तिघांनी मारहाण करून पाठीत चाकूने मारले. तसेच गोविंदच्या आईच्या नाकालाही चाकू मारून जखमी केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.

गोविंद पिसाळ शेतात काम करीत असताना नारायण पिसाळ, सिंधू पिसाळ, लक्ष्मण होळकर तेथे आले. त्यांनी माझ्या शेतातून बैलगाडी का नेली म्हणून वाद घातला. तर नारायणने खिशातून चाकू काढून गोविंदच्या पाठीत मारून गंभीर जखमी केले. सिंधू व लक्ष्मणने त्याला पकडून ठेवले होते. भांडण सोडवत असलेल्या गोविंदची आई कमलाबाई यांच्याही नाकावर चाकू मारला. याबाबत परभणी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या गोविंदच्या जबाबवरून हट्टा पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले
कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याप्रकरणी दोन जणांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सदर पीडितेस कैलास किसन कासोळकर रा.सोडेगाव व चांदू लक्ष्मण वाघमारे रा.अकोला या दोघांनी मोटारसायकलवरून पळविले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: A bullock cart plowed through the field, stabbing the farmer in the back; they also attacked his mother's nose