हिंगोली येथील बीएसएनएल सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:51 IST2018-02-12T00:51:36+5:302018-02-12T00:51:39+5:30
जिल्ह्यात रविवारी वीजेच्या कडकडाटांसह हजेरी लावलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. तर ‘ब्रॉड ब्रॅण्ड’ सेवाही दिवसभर ठप्प झाल्याने अनेकांची कामे खोळंबली होती.

हिंगोली येथील बीएसएनएल सेवा ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात रविवारी वीजेच्या कडकडाटांसह हजेरी लावलेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. तर ‘ब्रॉड ब्रॅण्ड’ सेवाही दिवसभर ठप्प झाल्याने अनेकांची कामे खोळंबली होती.
रविवार असल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज बंद होते. त्यामुळे बिएसएनएल सेवेचा परिणाम दिसून आला नाही. परंतु अनेक ठिकाणच्या खासगी कार्यालयात, नेटकॅफे, इतर सेवा केंद्रात नेट सेटरवर कामे करण्याची वेळ आली होती. रात्री उशिरापर्यंत सेवा सुरुच झालेली नव्हती. त्यामुळे आॅनलाईनद्वारे केली जाणारी अनेक कामांचा खोळंबा उडाला होता.