पुरात वाहून गेलेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 11:19 IST2020-06-20T11:18:36+5:302020-06-20T11:19:10+5:30

कुंडलिकराव असोले व धृपताबाई असोले दोघेजण बैलगाडीसह पुरात वाहून गेल्याने त्यांचा शोध घेणे सुरू होते.

The body of female found in the floodwaters at Kalmanuri Taluka | पुरात वाहून गेलेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह आढळला

पुरात वाहून गेलेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी महिलेचा मृतदेह आढळला

कळमनुरी : येथून जवळ असलेल्या बुडकी नाल्यात पुरात वाहून गेलेल्या महिलेचा 20 जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. काल झालेल्या पावसामुळे असोलवाडीतील वृद्ध दाम्पत्य पुरात वाहून गेले होते. काल रात्री उशिरापर्यंत पर्यंत शोधकार्य सुरू होते.

 कुंडलिकराव असोले व धृपताबाई असोले दोघेजण बैलगाडीसह पुरात वाहून गेल्याने त्यांचा शोध घेणे सुरू होते. परंतु रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नव्हता. अखेर धृपताबाई यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. तर कुंडलिकराव असोले यांचा शोध घेणे सुरू आहे.

Web Title: The body of female found in the floodwaters at Kalmanuri Taluka