उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:27 IST2018-07-21T00:27:23+5:302018-07-21T00:27:38+5:30
नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड हिंगोली रोड वरील शेर-ए-पंजाब धाब्यासमोर दोन ते तीन दिवसांपासून एक ट्रक उभी होती. ट्रक चा क्रमांक जीजे १४ डब्ल्यू- २८२७ या ट्रकच्या केबिन मध्ये ताडपत्रीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला.कुणीतरी बाळापुर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे, सहा. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ दीपक ,जमादार संजय मार्के, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, आर्षद पठाणसह पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केबिनमधून मृतदेह बाहेर काढला व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतदेहाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा अधिक तपास केल्यानंतरच खुलासा होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे.