वसई शिवारात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:53 IST2018-10-09T00:53:10+5:302018-10-09T00:53:27+5:30
कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली.

वसई शिवारात आढळला मृतदेह
कळमनुरी/औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील वसई शिवारातील झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह ८ आॅक्टोबर रोजी ग्रामस्थांना आढळून आल्याची घटना घडली. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्यानदेव निवृत्ती साबळे (५५) रा. वसई ता. औंढा नागनाथ असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात केले होते. पोहकॉ राठोड यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदरील घटना खून की आत्महत्या? याचा पोलीस शोध घेत आहेत. तपास पोउनि जामगे करत आहेत.
वाहनचालकांवर कारवाई; दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर पोलिसांनी ७ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २० वाहन चालकांकडून पोलिसांनी ५ हजार ८०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दीळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलिसांनी कारवाई केली.
विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
औंढा नागनाथ : तालुक्यातील भगवा येथील स्वाती सचिन जायभाय (२५) या विवाहित युवतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. सदर विवाहिता सासरच्या घरी मृत अवस्थेत आढळून आली होती. दोन्ही कुटूंबात वाद सुरु आहे. सदरील युवतीस औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात पोलीस हजर होते.