मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:12 IST2018-07-20T00:12:30+5:302018-07-20T00:12:44+5:30
लुक्यातील दगडगाव भागातील खदानीत बुधवारी पोहताना बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरूवारी सापडला.

मृतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : तालुक्यातील दगडगाव भागातील खदानीत बुधवारी पोहताना बुडालेल्या तरुणाचा मृतदेह गुरूवारी सापडला.
वसमत येथील २५ वर्षीय तरुण गणेश जाधव हा बुधवारी खदानित पोहताना बुडाला होता. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह सापडला नव्हता. डीवायएसपी शशिकिरण काशिद सपोनि बंदखडके, जमादार बडे आदींनी परिश्रम घेऊन मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील तरुणांनीही परिश्रम घेतले. मृतदेह सापडत नसल्याने नांदेडच्या वनविभागाच्या जीवरक्षक दलाला पाचारण केले. त्यांनी मृतदेह शोधला.