पवारांची साथ सोडली, भाजपमध्ये आले अन् आता थेट राज्यसभा! रामराव वडकुते यांना 'लॉटरी'

By रमेश वाबळे | Updated: March 4, 2026 12:53 IST2026-03-04T12:52:10+5:302026-03-04T12:53:39+5:30

हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष! धनगर समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपने साधलं समीकरण

BJP's big move! Political Jackpot! BJP Picks Dhangar Leader Ramrao Wadkute for Rajya Sabha | पवारांची साथ सोडली, भाजपमध्ये आले अन् आता थेट राज्यसभा! रामराव वडकुते यांना 'लॉटरी'

पवारांची साथ सोडली, भाजपमध्ये आले अन् आता थेट राज्यसभा! रामराव वडकुते यांना 'लॉटरी'

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य रामराव वडकुते यांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची ‘लॉटरी’ लागली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वडकुते ४ फेब्रुवारी रोजी तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राजकीय प्रवासाचा टप्पा
रामराव वडकुते हे धनगर समाजाचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या वडकुते यांनी शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून काम केले होते. २००२ मध्ये अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली होती. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपकडून पुनर्वसन
भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे हिंगोली लोकसभा प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू होती. अखेर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना संधी देऊन हिंगोली जिल्ह्याला संसदेत प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : भाजपा ने रामराव वडकुते को राज्यसभा के लिए नामांकित किया

Web Summary : भाजपा ने पूर्व विधायक रामराव वडकुते, जो एक प्रमुख धनगर नेता हैं, को राज्यसभा के लिए नामांकित किया। वडकुते, जो पहले एनसीपी में थे, 2019 में भाजपा में शामिल हुए थे। इस निर्णय से हिंगोली भाजपा कार्यकर्ताओं में उत्साह है।

Web Title : BJP Nominates Ramrao Wadkute for Rajya Sabha Seat

Web Summary : BJP nominated former MLA Ramrao Wadkute, a prominent Dhangar leader, for Rajya Sabha. Wadkute, previously with NCP, joined BJP in 2019. This decision has energized Hingoli BJP workers.