शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-कॉंग्रेस- ठाकरे गटाची सेनगाव बाजार समितीत युती; दोन्ही पदे बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 19:05 IST

सेनगाव बाजार समिती सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी कॉंग्रेसचे मदन इंगोले यांची बिनविरोध निवड

सेनगाव: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे अशोक ठेंगल तर उपसभापतीपदी काँग्रेसचे मदन इंगोले यांची सोमवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बाजार समितीच्या सभागृहात आज विशेष सभा पार पडली. बैठकीस सर्व १८ संचालक उपस्थित होते. सभापतीपदाकरीता भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक ठेंगल यांचा तर उपसभापतीकरीता काँग्रेसचे मदन इंगोले यांचा एकमेव अर्ज आल्याने सभापतीपदी ठेंगल तर उपसभापतीपदी इंगोले यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. या बैठकीला संचालक अशोक ठेंगल, मदन इंगोले, संजय देशमुख, चंद्रकांत हराळ, भास्कर पाटील, पुरुषोत्तम गडदे, संतोष देवकर, नथुजी कावरखे, नारायण सावके, अंकुश तिडके, वैभव देशमुख, विजय तोष्णीवाल, प्रकाश बीडकर, भिकाजी अवचार, छायाताई पोले, दीक्षा नरवाडे, संजिवनी बोर्डे, विकास शिंदे आदी संचालकांची उपस्थिती होती. 

भाजप, कॉंग्रेस, ठाकरे गटात समझोता बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदाकरीता भाजप, काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या युतीमध्ये राजकीय समझोता झाला. हिंगोली बाजार समितीच्या समिकरणाच्या अनुषंगाने सेनगावात आघाडी करुन सुरुवातीला भाजपला दोन वर्षे सभापतीपद, त्यानंतर काँग्रेसला सभापतीपद तर उर्वरित दोन वर्षे शिवसेनेच्या वाट्याला उपसभापतीपद येणार आहे. उपसभापतीपद हे तिन्ही पक्षांनी प्रत्येकी २० महिने या पद्धतीने विभागून घेतले आहे. राज्यात वरिष्ठ पातळीवर परस्पर विरोधी कट्टर भूमिका घेणारे भाजप-सेना-काँग्रेस सेनगाव बाजार समितीच्या सत्तेकरीता मात्र तत्वनिष्ठा बाजूला ठेवून मांडीला मांडी लावून बसणार आहेत. निर्वाचित पदाधिकाऱ्यांचा या वेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,दिनकरराव देशमुख,द्वारकादास सारडा,अँड. के.के.शिंदे आदी उपस्थितीत होते. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीmarket yardमार्केट यार्डBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे