पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 06:29 PM2024-04-18T18:29:11+5:302024-04-18T18:31:50+5:30

गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.

Bike accident on Purna sugar Factory Road; One died on the spot, one seriously injured | पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पूर्णा कारखाना मार्गावर दुचाकीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

वसमत (जि. हिंगोली): पूर्णा सहकारी साखर कारखाना मार्गावर पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीस उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेदरम्यान घडली.

वसमत ते पूर्णा मार्गावर १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान हिंगोली येथून पूर्णेकडे जाणाऱ्या दुचाकीस अज्ञात वाहनाने उडविले. या अपघात दुचाकीस्वार रिहान अनवर अहेमद (वय १८) हा जागीच मृत्यू पावला. तर इम्रान शेख अनवर हा गंभीर जखमी झाला दोघे रा पुर्णा जि परभणी येथील आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, साहेबराव चव्हाण, अजय पंडित आदींनी धाव घेतली. गंभीर जखमीस पोलिसांनी नागरीकांची मदत घेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. इम्रानची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर वसमतच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.

Web Title: Bike accident on Purna sugar Factory Road; One died on the spot, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.