शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षाला मारहाण; नगरसेवकासह तिघांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST

हिंगाेली : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाला जीवे मारण्याच्या उद्देशाने टिप्परने जोराची धडक दिली. यावेळी ...

हिंगाेली : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाला जीवे मारण्याच्या उद्देशाने टिप्परने जोराची धडक दिली. यावेळी बेले यांना लोखंडी टॉमीने मारहाण केल्याप्रकरणी एका नगरसेवकासह तिघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले हे ९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास (एमएच ३८ जी १००९) या शासकीय वाहनाने गावाकडून शासकीय निवासस्थानाकडे येत होते. त्यांचे वाहन हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आले असता, शासकीय निवासस्थानाकडे वळत होते. यावेळी आपले वाहन पकडण्याच्या उद्देशानेच समोरील शासकीय वाहन थांबले असल्याच्या भीतीने (एमएच १२ एचडी ३१५६)च्या टिप्पर चालकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने गणाजी बेले यांच्या शासकीय वाहनाला जोराची धडक दिली. त्यानंतर तिघांनी गणाजी बेले यांना लोखंडी टॉमीने मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या शासकीय वाहनातील सहकाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले (रा. खेर्डावाडी) यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक आरेफ शे., अजीज शे. शादीक, शे. शाबाद (सर्व रा. हिंगोली) यांच्याविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे, पोलीस उपनिरीक्षक केणेकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.