छुल्लक कारणावरून कुटुंबास मारहाण; सतरा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:25 IST2020-12-31T18:24:33+5:302020-12-31T18:25:37+5:30
Crime News Hingoli कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करत काठी कुऱ्हाडीने मारहाण करून केले जखमी

छुल्लक कारणावरून कुटुंबास मारहाण; सतरा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : तुझ्या मुलाने वाद का घातला ? या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत जमावाने काठ्या कुर्हाडीने मारहाण करून एका कुटुंबास गंभीर जखमी केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी फुटाणा गावात घडली. याप्रकरणी सतरा जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील शिवाजी रामराव नरवाडे त्यांचा मुलगा व सुनेस जमावाने शेतात जाऊन वाद घातला. जातीवाचक शिवीगाळ केली व काठ्या कुर्हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी शिवाजी रामराव नरवाडे यांच्या तक्रारीवरून माधव दत्तराव कदम, गंगाधर धोंडबा पवार, गजानन धोंडबा पवार, अनिल धोंडबाराव पवार, रामदास दादाराव कणके, नंदू हरिभाऊ कदम ,कपिल हरिभाऊ कदम, सुनील हरिभाऊ कदम, दीपक हरिभाऊ कदम ,बालाजी बळीराम कदम, कैलास बळीराम कदम, प्रविण दत्तराव कदम ,अरविंद दत्तराव कदम, गणेश गंगाधर कदम, संगीता गंगाधर कदम, सुनिता गजानन पवार, सविता अनिल पवार ( सर्व राहणार फुटाणा तालुका कळमनुरी) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 324 ,323,506,143,147,149 व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (आर )(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला आहे.