शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

उशिराने का होईना; अखेर मानधन खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:52 AM

मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट: स्वयंपाकी मदतनिसांना मिळत नसल्याने केला होता पाठपुरावा

हिंगोली : मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.जिल्हा परिषदेच्या जवळपास १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचनाही शिक्षण विभागास आहेत. जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाºया मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ चे मानधन बाकी आहे. शिवाय दोन महिन्याचे इंधन व भाजीपाल्याची रक्कम मात्र मिळाली नाही. मागील अनेक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने मात्र मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. स्वयंपाकी मदतनिसांना मानधन मिळत नसल्याचे वृत्त वारंवार लोकमतने प्रकाशित केले. त्यामुळे उशिराने का होईना याबाबत शासनाकडून दखल घेत सात महिन्यांचे मानधन मदनिसांना वाटप केले आहे. मदतनिसांचे मानधन संदर्भात बँकीतील अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मानधनाची रक्कम मदतनिसांना वाटप केल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले. मदतनिसांना मानधन देण्यात यावे, यासाठी महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष जिरवणकर यांनी वेळोवेळी शिक्षणाधिकारी व जि. प. प्रशासनास निवेदन सादर केले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. कधी शाळेत तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही, तर कधी धान्यादी मालच नसतो. तर कधी इंधन भाजीपाल्याचा खर्च दिला जात नाही. त्यात स्वयंपाकी मदतनिसांनाच्या मानधनाचा प्रश्न हा गंभीर आहे. वेळेत मानधन देण्याची मागणी मदतनिसांतून केली जाते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळाEducationशिक्षण