औंढा पोलिसांच्या कारवाईत चंदन चोर जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 13:48 IST2021-06-10T13:46:53+5:302021-06-10T13:48:44+5:30

तहसील समोरील लोहारा रोडवर पोलिसांची कारवाई

Aundha police action sandalwood thief arrested; Three lakh items confiscated | औंढा पोलिसांच्या कारवाईत चंदन चोर जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

औंढा पोलिसांच्या कारवाईत चंदन चोर जेरबंद; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ : येथील तहसील समोरील लोहारा रोडवर कारवाई करत पोलिसांनी एका चंदन चोरास ताब्यात घेतले आहे. यावेळी एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी एक कार, चोरीचे चंदन जप्त केले आहे. 

पोलिसांनी लोहारा रोडवर गुरुवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान एका संशियत कारला ( एम एच ०१-AE - ०६५९ ) अडवले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये चंदन लाकूड (रक्तचंदन) आढळून आहे. पोलिसांनी लागलीच उमाकांत विठ्ठलराव बोंगाने ( रा. उमरा ) यास ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी दिनेश जाधव हा गाडी सोडून पळून गेला. एक लाखाचा मुद्देमाल व दोन लाखाची गाडी असा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, एएसआय दिनकर विरकर , ज्ञानेश्वर गोरे, अतुल बोरकर, गजानन गडदे, संतोष धनवे यांनी केली.

Web Title: Aundha police action sandalwood thief arrested; Three lakh items confiscated