शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतीस्तंभाचा औंढा नगरपंचायतला विसर; फुलविक्रेत्यांनी सजावट करून केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 19:03 IST

स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली): येथील मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेऊन हुतात्मा झालेल्या २१ स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्तंभास १७ सप्टेंबर रोजी अभिवादन करण्याऐवजी त्यांचा सन्मान केला नसल्याची तक्रार हुतात्म्याचे नातेवाईकांनी करून संताप व्यक्त केला आहे. या उलट या स्तंभास फुलविक्री करणाऱ्यांनीच फुले वाहून अभिवादन केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला आहे.

स्मृतीस्तंभास स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी व मराठवाडा मुक्तिसंग्राम या दिवशी अभिवादन केले जाते; परंतु सध्या औंढा येथील स्मृतिस्तंभाचा नगरपंचायत प्रशासनास मागील दोन वर्षांपासून विसर पडला असून १७ सप्टेंबर रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. हा स्मृती स्तंभ औंढा- हिंगोली या महामार्ग लगतच्या मुख्य रस्त्यावर आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या २१ कुटुंबियांचा ग्रामपंचायतकडून सत्कारही केला जात असे; परंतु आता नगरपंचायत झाली अन् पूर्वीसारखा सत्कार समारंभ होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत हुतात्मा गणपत ऋषी यांचे नातू कृष्णा ऋषी यांनी नगरपंचायत गाठून जाब विचारला आहे; परंतु प्रशासनाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहिला नसल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतीकडून स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली नसल्याची चर्चा आहे. 

फुलविक्रेत्यांनीच केली स्तंभाची सजावट  विशेष म्हणजे स्तंभ परिसरात फुलांची विक्री करणाऱ्या मुस्लिम समाजातील फुल विक्रेत्यांनी हा स्तंभ फुलांनी सजवून अभिवादन केले. आज १७ सप्टेंबरच्या दिवशी त्यांनी हौतात्म्यांचे स्मरण केले. मुख्याधिकारी म्हणतात आम्हीही केलं अभिवादन याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना विचारले असता त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन करण्याची सर्वच यंत्रणेची जबाबदारी आहे. आम्ही व नगराध्यक्ष सविता चौंढेकर यांनी सकाळी  जाऊन या स्तंभाला अभिवादन केले आहे. मात्र या स्तंभाच्या रंगरंगोटीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. त्यामुळे त्यांनी रंगरंगोटी का केली नाही, हे सांगता येणार नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarathwadaमराठवाडा