दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:45 IST2019-02-20T00:45:20+5:302019-02-20T00:45:36+5:30
दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणत आरोपींनी संगनमत करून जयश्री मोरे या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नर्सी नामदेव : दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणत आरोपींनी संगनमत करून जयश्री मोरे या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री जयपाल मोरे या महिलेस आरोपींनी संगनमत करून दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणून थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जयश्री मोरे या महिलेने नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी जयपाल नाथा मोरे, प्रजावती जयपाल मोरे, अशोक नाथा मोरे, सचिन रामकिशन मोरे (सर्व रा. आठ्ठरवाडी) यांनी संगनमत करून दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि ए.जी. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी येवते हे करीत आहेत. फिर्यादी व आरोपी हे सध्या विभक्त असून फिर्यादी या कळमकोंडा येथे राहतात.