व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:02 IST2023-07-05T13:02:39+5:302023-07-05T13:02:54+5:30
ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांत दिली तक्रार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत
आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : एका विवाहित महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना चिखली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दीपक दिगंबर बोंढारे यास अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असलेल्या एका 33 वर्षीय महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ दीपक दिगंबर बोंढारे याने चोरून चित्रित केले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर सातत्याने अत्याचार केला. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने दिनांक 4 जुलै रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दीपक दिगंबर बोंढारे (राहणार चिखली तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली) याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 376 ( 2 ) ,(एन. ) ,323, 506 अन्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करत आहेत.