Art of Living's Sanitation Campaign | आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वच्छता अभियान

आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत: शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छता ही मानव सेवा समजून सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी या ग्रुपच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य परिसराची साफसफाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्यात आली. यावेळी बंडेवार, बांगर, मंगल कदम, जामगे, नाईक, मंगरूळकर, बालाजी उपरे, वाकळे , शिंदे, तायडे , चौधरी , माया अत्रे, भायेकर आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Art of Living's Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.