शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नगरपालिकेच्या १४५ घरकुलांच्या विशेष प्रकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 6:48 PM

या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते.

ठळक मुद्देनगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षीपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे सुरू

हिंगोली : शहरात प्रधानमंत्री आवास योजनेत ९५९ घरकुलांचा प्रकल्प आधीच मंजूर असताना आता अपंग, विधवा, सफाई कामगार अशा एकूण १३९ जणांसाठी घरकुलांचा विशेष प्रकल्प मंजूर झाला आहे. लवकरच ही कामेही सुरू केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

हिंगोली नगरपालिकेच्या हद्दीत मागील वर्षीपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे सुरू झाली आहेत. हिंगोलीसाठी प्रधानमंत्री घरकुलमध्ये वेगवेगळे तीन विकास आराखडे मंजूर झाले होते. यात ६0९, १५0 व २00 घरकुलांचे हे आराखडे होते. याची एकूण संख्या ९५९ एवढी आहे. तर यापैकी ८१२ घरकुलांचे काम सुरू करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना ३00 स्क्वेअर फुटांपर्यंतचे बांधकाम करता येते. त्यासाठी अडीच लाखांचे अनुदान शासन देते. यापेक्षा जास्त बांधकाम होत असल्यास लाभार्थ्यांना पदरमोड करावी लागते. यामध्ये लाभार्थ्यांच्या गरजेनुरुप सोय होईल, अशी व्यवस्था केली आहे. या योजनेत ५00 कामे सुरू असून १५६ घरकुलांचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

सध्या जी कामे सुरू झाली त्यामध्ये ४६५ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. यापैकी ३४५ घरकुलांचे काम पुढच्या टप्प्यात गेल्याने त्यांना दुसरा हप्ताही वितरित केला होता. तर २१३ जणांना तिसरा हप्ता वितरित केला आहे. त्यामुळे ही कामे अंतिम टप्प्यात असून ही कामे पूर्ण झाल्यास एकूण कामे पूर्ण होत असल्याची संख्या साडेतीनशेच्या पुढे जाणार आहे. मध्यंतरी या योजनेत निधीची अडचण असल्याने लाभार्थ्यांची ओरड होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासनही हैराण होते. न.प. पदाधिकाºयांना भेटण्यासाठी अनेकदा शिष्टमंडळे येत होती. नगरसेवकांसाठीही ही बाब डोकेदुखी बनली होती. त्यामुळे प्रशासनही अडचणीत सापडले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरणाचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर ज्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित झाला, अशा लाभार्थ्यांनी आपल्या कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च एण्डपर्यंत जास्तीत-जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

आचारसंहितेत फटका; कामे लांबलीमागील वर्षभरात दोनदा आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना मंजूर घरकुलाच्या निधीसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. ज्यांना दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळायचा होता, अशांची कमी मात्र पहिलाच हप्ता मिळण्यासाठी दोनदा आचारसंहितेच्या कचाट्यात लाभार्थी सापडले होती. या आचारसंहितेच्या काळातील निधी वितरणाच्या बंधनामुळे कामे लांबली आहेत. अनेकांनी घराचे बांधकाम होणार असल्याने पूर्वीचा निवारा पाडल्याने अशांना तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तर अनेकांनी भाड्याचे घर घेतल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागला. यापुढे या कामात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. लाभार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर वेळेत निधी मिळेल. उर्वरित लाभार्थ्यांनीही कामे सुरू करावी. ज्यांना आदेश मिळाले त्या सर्वांनी घरकुलाचे काम सुरू करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHomeघरGovernmentसरकार