जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णवाहिका चालकासह 2 अपघातग्रस्तांचे निधन, 4 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 20:15 IST2022-11-22T20:15:31+5:302022-11-22T20:15:47+5:30
नांदेड-हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील हिवरा पाटीजवळ झाला अपघात

जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णवाहिका चालकासह 2 अपघातग्रस्तांचे निधन, 4 जखमी
गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड ) :नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त पुढील उपचारासाठी नेत असतांना वरुड तांड्या जवळ झालेल्या अपघातात रूग्णवाहीका चालक ठार झाला असून चालक बळीराम दत्तराव वाघमारे व अपघात ग्रस्त किशन गोवंदे असे मृतांचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून एका अपघात ग्रस्त रुग्णास पुढील उपचारासाठी नांदेड येथे घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहीकेचा अपघात घडला असल्याची माहिती आहे. सुधाकर पंडित रा. हिवरा वय ४७ यांचे उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रूग्णालयात रात्री ८:४० सुमारास निधन झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हिवरा पाटी जवळ किशन गोवंदे राहणार हिवरा यांचा अपघात झाला असता त्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक रुग्णालय डोंगरकडा येथे दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यांना डोंगरकडा येथील १०२ रुग्णवाहिकेत पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले.
प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथील १०२ रुग्णवाहिकेत रुग्णाला पुढील उपचारासाठी नांदेड येथे घेऊन जात असतांना वरुड तांड्यापासून २०० मीटर अंतरावर १०२ रुग्णवाहिक क्र.( एम.एच.३८ एक्स २४४३ ) व हायवा ट्रक दोघांची समोरासमोर जबर धडक झाली या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक बळीराम वाघमारे वय ३५ यांचा घटनास्थळी मृत्यू झाला व अपघात ग्रस्त किशन गोवंदे कृष्णा राठोड वय १४ हे तिघे गंभीर जखमी झाले.
अपघात ग्रस्ताचे नातेवाईक अन्य चौघे जण किरकोळ जखमी झाले होते. सर्व जखमींना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ६२ वर्षीय अपघातग्रस्त किशन गोवंदे रा.हिवरा यांना मयत घोषित केले. अन्य जखमींना कृष्णा राठोड वय १४ यांना महामार्ग रुग्णवाहिकेने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. किशन गोवंदे यांचा मृतदेह अर्धापूर ग्रामीण येथे व चालक बळीराम वाघमारे यांचा मृतदेह डोंगरकडा प्राथमिक रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवला आहे. सुधाकर पंडित रा. हिवरा वय ४७ यांचे उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रात्री ८:४० सुमारास निधन झाले.