हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी आमदार मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:39 IST2018-08-08T13:38:34+5:302018-08-08T13:39:11+5:30
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या देऊन भजन आंदोलन करण्यात आले.

हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी आमदार मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या
हिंगोली : येथील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या देऊन आज सकाळी ११ वाजे दरम्यान भजन आंदोलन करण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोलीत मागील दहा दिवसांपासून गांधी चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज आंदोलकांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरासमोर भजन आंदोलन सुरू केले आहे. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार व आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आमदार मुटकुळे हे मराठा असूनही आंदोलनात सहभागी झाले नाहीत शिवाय त्यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.